Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला; ‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल

Ganesh Bhokare

कसबा पेठ (पुणे) : Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने प्रभाग १५ मधून हेमंत रासने (Hemant Rasane) यांना दोन वेळा नगरसेवक केले. त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद दिले. त्यांनी चाळीस हजार कोटी रुपयांचे बजेट केले, पण प्रभागात शून्य काम. यामुळेच पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला असताना कोणते टॅलेंट पाहून भाजपने (BJP) त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली याबाबत शंका उपस्थितीत होत आहे. भाजपने गोवा निवडणुकीचा सर्व खर्च या स्थायी समितीतून मिळवलेल्या पैशातून केल्याचा आरोप मनसेचे (MNS Candidate) कसबा मतदार संघातील उमेदवार गणेश भोकरे (Ganesh Bhokare) यांनी पत्रकार परिषदेत केला. एवढेच न्हवे तर लोकसभा निवडणुकीत आम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार केला असताना रासने म्हणतात बॅलेट पेपर वरील उमेदवाराला मी ओळखत नाही हा त्यांचा अहंकार जनताच निवडणुकीत उतरवणार असा दावा देखील भोकरे यांनी यावेळी केला.

मनसे चे उमेदवार गणेश भोकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप चे उमेदवार हेमंत रासने यांना टार्गेट करतानाच काँग्रेस चे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचाही योग्यवेळी भांडाफोड करण्याचा इशारा दिला. यावेळी मनसेचे नेते गणेश सातपुते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

रवींद्र धंगेकर २०१७ मध्ये मनसेमधून बाहेर पडले. सुरवातीला भाजपकडे गेले. पण त्यांनी पक्षात घेतले नाही. नंतर ते काँग्रेस पक्षात गेले आणि आमदार झाले. ज्या मनसेने त्यांना घडवले, त्यावर आज ते खालच्या भाषेत टीका करत आहेत, यातून त्यांची कृतघ्नता दिसून येते. २०१४ मध्ये कसब्यात धंगेकर यांनी मनसेचा उमेदवार असतानाही नेमके कोणत्या उमेदवाराचे काम केले आणि पैसे वाटले हे आम्हाला माहिती आहे. अनेक प्रकरणांमध्ये सेटलमेंट करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे लवकरच उघडी करणार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपचे हिंदुत्व फक्त मिरवायचे आहे. त्यांचे नेते मुस्लिमांवर टीका करतात आणि त्यांचे उमेदवार हेमंत रासने त्यांच्यापुढे गुडघे टेकवतात. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते , गोरक्षक नाराज आहेत. ते आमच्या सोबत आले आहेत. रासने हे मोठ्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या लेखी छोट्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना काही किंमत नाही. पोटनिवडणुकीत त्यांनी प्रत्येक मताला दोन हजार रुपये दिले होते आता पाच हजार देण्याची तयारी ठेवली आहे. मंडळांना पाच लाख रुपयांची ऑफर दिली आहे. परंतु त्यांची ही ऑफर धुडकावत मंडळांचे कार्यकर्ते देखील आमच्यासोबत आले आहेत, असा दावा देखील भोकरे यांनी यावेळी केला.

भोकरे म्हणाले आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी मध्यवर्ती पेठांचा विकास खुंटवला आहे. यामुळे स्थानिक नागरिक बाहेर पडत आहेत. मुलांना खेळायला जागा नाही की ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी सोय नाही. याचा सामजिक परिणाम होत आहे. मध्यवर्ती शहराचा सुनियोजित विकास करण्यासाठी विकास नियमावली मध्ये बदल करण्यासाठी मी प्रयत्न करेल. महिलांच्या सुरक्षिततेला माझे प्राधान्य राहील.

जिथे उमेदवार नाही तिथे मनसे तटस्थ

मनसे राज्यात १३७ हून अधिक जागांवर निवडणूक लढवत आहे. पुण्यात चार जागांवर उमेदवार असून सर्व कार्यकर्ते येथे प्रचारात उतरवले आहेत.
ज्या ठिकाणी मनसे चे उमेदवार नाही त्या पर्वती, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि वडगाव शेरी मतदार संघात मनसे तटस्थ राहणार आहे,
असे मनसेचे नेते गणेश सातपुते यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत मनसे ने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता.
राज ठाकरे यांनी पुण्यात सभाही घेतली होती. मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol)
यांच्या प्रचारात आणि विजयात मनसेचा मोठा वाटा राहिला असल्याचे भाजप नेते जाहीरपणे मान्य करतात. (Kasba Peth Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed