Kasba Peth Assembly Election 2024 | पोटनिवडणुकीत पराभव तरीही भाजपकडून पुन्हा संधी; हेमंत रासनेंनी दीड वर्षात बदललं कसब्याचं गणित

पुणे : Kasba Peth Assembly Election 2024 | कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) आणि पाेटनिवडणुकीतील उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या नावाची चर्चा होती. यातच ब्राम्हण समाजाला या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात होती त्यामुळे उमेदवार देताना भाजपकडून सावध पावलं उचलली जात होती.
मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर याठिकाणी झालेल्या पाेटनिवडणुकीत काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला होता. मात्र आता पुन्हा भाजपने रासने यांच्यावर विश्वास दाखवत कसबा विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली आहे.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत रासने यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु गेल्या दीड वर्षांमध्ये रासने यांनी मतदारसंघात संघटना बांधणीसोबतच नागरिकांमध्ये सहभागी होत केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा उमेदवारी मिळवली आहे.
पोटनिवडणुकीनंतर हेमंत रासने यांनी मतदारसंघात असणाऱ्या सहाही प्रभागांतील रस्त्यावर टेबल मांडत जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला. महाआरोग्य अभियान, लाडकी बहीण योजनेची नोंदणी मोहीम तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवला.
भाजपने रासने यांच्यावर निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी कसब्यात मजबूत संघटना बांधणी केल्याने
लोकसभा निवडणुकीत आपल्याच मतदारसंघात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर पिछाडीवर गेले.
भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जवळपास १५ हजारांचे मताधिक्य कसब्यात मिळवले,
याचीच फलश्रुती उमेदवारी मिळवण्यात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Kasba Peth Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण