Kasba Peth Assembly Election 2024 | रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रेला मोठा प्रतिसाद; कसबा पुन्हा जिंकण्यासाठी धंगेकरांनी कसली कंबर

Ravindra Dhangekar (2)

पुणे : Kasba Peth Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. हा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार (MVA Candidate) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी कंबर कसली आहे तर हा मतदारसंघ पुन्हा भाजपमय (BJP) करण्यासाठी हेमंत रासने (Hemant Rasane) प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काल (दि.९) पदयात्रा पार पडली. त्यामध्ये ना. सी. फडके चौक साने गुरुजी नगर – लोकमान्य नगर – नवीपेठ तालीम, लोकमान्य वाचनालय, २१४ नवी पेठ, पवार हॉस्पिटल, नवीपेठ तालीम, कृष्णा हरिदास पथ, न्यु इंग्लिश हायस्कूल मागील रस्ता, पवन हॉटेल, अशोक विद्यालय, अण्णाभाऊ साठे वसाहत, अलका चौक, भारती विद्यापीठ भवन, गांजवे चौक, सेनादत्त पेठ परिसर, राजेंद्र नगर, १००५ विवेक श्री, सचिन तेंड़लकर पार्क, दत्तवाडी चौक, नवयुग मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, गुरुदत्त मंडळ, शनि मंदिर, फाळके प्लॉट, हनुमान नगर, दत्तवाडी पोलिस चौकी, विजयी चैतन्य मित्र मंडळ,अमरज्योत मित्र मंडळ, धिमधिमे ऑफिस, शास्त्री पुतळा अशा स्वरूपात पार पडली. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी रवींद्र धंगेकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

कसबा विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर विद्यमान आमदार आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आता कसबा विधानसभा मतदारसंघातील जनता कोणाला कौल देते?
महायुतीला की महाविकास आघाडीला? की अजून इतर कोणत्या पक्षाला? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)

You may have missed