Kasba Peth Assembly Election 2024 | शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत गणेश भोकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Ganesh Bhokre

गणेश भोकरे कसब्याचा गड जिंकूनच येणार: शर्मिला ठाकरे

पुणे: Kasba Peth Assembly Election 2024 | कसबा विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS Candidate) अधिकृत उमेदवार गणेश भोकरे (Ganesh Bhokre) यांनी मनसे नेत्या शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांच्या उपस्थितीत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, ग्रामदैवत कसबा गणपतीचे (Kasba Ganpati) दर्शन घेऊन शेकडो कार्यकर्त्यांसमवेत मतदारसंघात मिरवणूक काढत भोकरे यांनी शक्तिप्रदर्शन केले. ‘राजसाहेबांचा शिलेदार, कसब्यात विजयी होणार’ असा विजयी संकल्प कार्यकर्त्यांनी केला. गणेश कला क्रीडा मंच येथे अर्ज दाखल करताना शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता, भोकरे यांच्या पत्नी अमृता भोकरे, शहर संघटक निलेश हांडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे गेमचेंजर राहणार आहे. आमचे सर्व उमेदवार तरुण, तडफदार आणि विकासाच्या वाटेवर चालणारे आहेत. राज्यातील राजकारण वाईट स्थितीतून जात असताना सर्वसामान्यांचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. याकडे मनसेने लक्ष केंद्रित केले असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर, विकासाच्या मुद्द्यांवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या रक्षणावर ही निवडणूक आम्ही लढत आहोत. मनसेने युवा नेतृत्वाला संधी दिलेली आहे. गणेश भोकरे हे तरुण आणि विकासाचा चेहरा असलेले उमेदवार आहेत. कसबा मतदारसंघांमध्ये जनता त्याचत्याच लोकांना कंटाळली असून, जनता नवा आणि तरुण उमेदवार गणेश भोकरे यांना विजयी करेल, असा विश्वास आहे.”

“राज्यभरात मनसेचे सर्वच उमेदवार विजयी होण्यासाठी रणांगणात उतरले आहेत. माहीममध्ये अमित ठाकरे यांचा विजय निश्चित आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्याकडे आम्ही कोणतीही विनंती केलेली नाही. आम्हाला लढून जिंकण्यात जास्त आवड आहे. त्यामुळे अमित येथे सर्वांशी चांगली लढत देईल आणि विजयी होईल, असा विश्वास आहे. पुण्यातही आमचे तीनही उमेदवार विजयी होतील. यांच्या अनागोंदीच्या राजकारणात केवळ मनसे जनतेच्या हिताचा विचार करीत आहे,” असेही शर्मिला ठाकरे यांनी नमूद केले.

गणेश भोकरे म्हणाले, “कसब्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या तीनही निवडणुकांत मतदारांनी मनसेला चांगला प्रतिसाद दिला होता. आधी भारतीय जनता पक्ष व आता काँग्रेसचे आमदार इथे आहेत. मात्र, कसब्याच्या समस्या अजूनही प्रलंबित आहेत. यांच्या गलिच्छ राजकारणाला जनता वैतागली असून, मनसे कसब्याच्या विकासाचे ध्येय घेऊन रिंगणात उतरलेली आहे.”

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पान टपरीतील चोरीच्या संशयावरुन तीक्ष्ण हत्याराने मारहाण करुन तरुणाचा खून

Purandar Assembly Election 2024 | पुरंदर मतदारसंघात काँग्रेसची पुनरावृत्ती की विजय शिवतारे गड जिंकणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Nirbhay Bano Campaigns | ‘निर्भय बनो’च्या सभा आता विधानसभेलाही होणार; मविआला सशर्त पाठिंबा; असीम सरोदे म्हणाले,”लाडकी नव्हे धाडसी बहीण योजना हवी”

Mantarwadi Pune Fire News | मंतरवाडीतील पेंटच्या गोडावूनला मध्यरात्री भीषण आग ! दोन टेम्पो, दोन दुचाकी ही आगीच्या भक्ष्यस्थानी (Video)