Kasba Peth Assembly Election 2024 | रवींद्र धंगेकर यांना दलित महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा; म्हणाले – ‘हा पाठिंबा दहा हत्तींचे बळ देणारा, विजयासाठी ऊर्जा देणारा’
पुणे : Kasba Peth Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), महायुतीकडून (Mahayuti) हेमंत रासने (Hemant Rasane) आणि मनसेकडून (MNS) गणेश भोकरे (Ganesh Bhokare) अशी तिरंगी लढत पाहण्यास मिळत आहे. तिन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे.
मागील काही वर्षात राज्याच्या राजकीय समीकरणात झालेल्या बदलामुळे स्थानिक राजकारणातही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे कसबा कोण जिंकणार? याची चर्चा सुरु आहे. दरम्यान या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना (दि.१५) दलित महासंघाच्या (Dalit Mahasangh) वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. दिवसेंदिवस मतदारसंघात धंगेकर यांना पाठिंबा वाढत आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले, ” दलितांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या दलित महासंघाच्या वतीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मला जाहीर करण्यात आलेला पाठिंबा दहा हत्तींचे बळ देणारा, विजयासाठी ऊर्जा देणारा आहे. आपल्या पाठिंबाच्या बळावर आपला प्रतिनिधी म्हणून दलित समाजाच्या हितासाठी मी नेहमीच कार्यरत असेल हा माझा शब्द आहे”, असे धंगेकर यांनी म्हंटले. (Kasba Peth Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”