Kasba Peth Assembly Election 2024| अखिल भारतीय जाणीव संघटना हातगाडी, फेरीवाले, स्टॉल व पथविक्रेते संघटनांकडून रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा; धंगेकर म्हणाले – ” पुणेकरांच्या सेवेसाठी मी कायमच खंबीरपणे उभा”
पुणे: Kasba Peth Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), महायुतीकडून हेमंत रासने आणि मनसेकडून गणेश भोकरे अशी तिरंगी लढत पाहण्यास मिळत आहे. तिन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. (Kasba Peth Assembly Election 2024)
मागील काही वर्षात राज्याच्या राजकीय समीकरणात झालेल्या बदलामुळे स्थानिक राजकारणातही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे कसबा कोण जिंकणार? याची चर्चा सुरु आहे. दरम्यान या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना (दि.१८) अखिल भारतीय जाणीव संघटना हातगाडी, फेरीवाले, स्टॉल व पथविक्रेते संघटना, पुणे या संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. मतदान काही तासांवर येऊन ठेपलं असताना मतदारसंघात धंगेकर यांना पाठिंबा वाढत आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले, ” कसबा विधानसभा मतदारसंघातील अखिल भारतीय जाणीव संघटना हातगाडी,
फेरीवाले, स्टॉल व पथविक्रेते संघटना पुणे या संघटनांनी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला.
त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. पुणेकरांच्या सेवेसाठी मी कायमच खंबीरपणे उभा आहे”,
असे धंगेकर यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’