Kasba Peth Pune Crime News | दारूच्या नशेत मेव्हण्यावर चाकूने सपासप वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : Kasba Peth Pune Crime News | घरात एकत्र दारु पित बसले असताना वाद होऊन त्यात मेव्हण्याच्या पोटात चाकूने सपासप वार (Stabbing Case) करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेत अक्षय सुनिल रिटे हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पुजा अमित पिल्ले (वय २९, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिचा पती अमित आनंदराज पिल्ले याला अटक केली आहे. ही घटना कसबा पेठेतील राहत्या घरी १७ सप्टेबर रोजी रात्री ९ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अमित पिल्ले व भाऊ अक्षय सुनिल रिटे हे घरी दारु पित बसले होते. दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. ते एकमेकांना शिवीगाळ करुन लागले. अमित याने रागाचे भरात घरातील किचनमध्ये जाऊन भाजी कापण्याचा चाकू घेऊन तो अक्षयला मारण्यास जाऊ लागला. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना अडविण्याचा प्रयतन केला. चाकू त्यांच्या उजव्या हाताला लागून त्या जखमी झाल्या. अमित पिल्ले याने अक्षय याला आज तुझा गेमच करतो, असे म्हणून त्याच्या पोटात दोन -तीन वेळा चाकूने भोकसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अक्षय गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी अमित पिल्ले याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक डुकरे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा