Katraj Kondhwa Road Accident | क्रेनच्या धडकेने मोटारसायकल चालकाचा मृत्यु ! कात्रज कोंढवा रोडवरील अपघातात वाढ

accident

पुणे : Katraj Kondhwa Road Accident | कात्रज कोंढवा रोडवरील वाहनांच्या संख्येने वेगाने वाढ झाली असली तरी गेली अनेक वर्षे रस्ता रुंदीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. अशातच पावसामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणावर अपघातांमध्ये वाढ झाली आहे. याच रोडवर क्रेनने पुढे जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. (Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAc9iwIJLJq

चंदाराम तेजाराम चौधरी (वय ३५, रा. ग्रीन कन्ट्री, भेकराईनगर) असे मृत्यु पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत जेठाराम बाबुलाल जाट (वय २०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी क्रेनचालक राजाराम भगवान देवकर (वय ४१, रा. कात्रज) याला अटक केली आहे. प्रकार खडी मशीन चौकाच्या पुढे बालाजी हॉटेलजवळ २६ सप्टेबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडला.

https://www.instagram.com/p/DAc72wopjDz

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि चंदाराम चौधरी हे त्यांचे नातेवाईक रामनिवास चौधरी यांच्या ग्रॅनाईटचे दुकानात कामाला आहे. दुकानातील काम संपवून रात्री साडेदहा वाजता चंदाराम यांच्या दुचाकीवर बसून फिर्यादी घरी जात होते. खडी मशीन चौकाच्या पुढे बालाजी हॉटेलजवळ पाठीमागून आलेल्या एका क्रेनने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादी बाजूला पडले तर चंदाराम हे उजव्या बाजूला क्रेनच्या समोर पडले. त्यामुळे चंदाराम चौधरी यांच्या अंगावरुन क्रेनचे चाक गेल्याने त्याचां जागीच मृत्यु झाला. पोलिसांनी क्रेनचालकाला अटक केली आहे.

https://www.instagram.com/p/DAc4RxEpR04

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)