Katraj Pune Accident News | पुणे: कात्रज चौकात टँकरच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

पुणे : Katraj Pune Accident News | शहरात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून कात्रज चौकामध्ये (Katraj Chowk) अपघाताचे सत्र सुरू असून यामध्ये नागरिकांना जीव गमावावा लागत आहे.
त्यातच आता एकीकडे गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरु असताना टँकर व दुचाकी अपघातात तरुणीला जीव गमवावा लागला आहे. (दि.१७) सकाळी साडे-सहाच्या सुमारास मानसी अशोक पवार Mansi Ashok Pawar (वय-२६ रा. आंबेगाव पठार) या वेस्पा दुचाकीवरून कात्रज कोंढवा रस्त्याच्या दिशेने जात असताना अज्ञात टँकरचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला.
काही दिवसापूर्वीच अशाप्रकारे एका कंत्राटी पीएमपी कामगाराचा तर एका तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हे अपघात सत्र कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच पुन्हा एका अपघातात तरुणीला जीव गमवावा लागला.
अपघातातील मृत तरुणीचा मृतदेह ससून (Sassoon Hospital) येथे पाठवण्यात आला. याबाबतचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस (Bharti Vidyapeeth Police) करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे (API Sameer Shende) यांनी दिली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा