Katraj Pune Crime News | महामार्गावरील पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या 12 जणांना अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

पुणे : Katraj Pune Crime News | महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा (Robbery Attempt On Petrol Pump) टाकण्यासाठी शनिनगर (Shani Nagar Katraj) येथील एका खोलीत जमलेल्या १२ जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) अटक केली. दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५ कोयते, ५ दुचाकी, मिरची पावडर, रस्सी असा २ लाख ५२ हजार १५० रुपयांचा माल जप्त केला आहे.
प्रथमेश ऊर्फ देवीदास कुडले (वय २३, रा. दत्तनगर), प्रकाश पाराजी काटे (वय २४, रा. दत्तनगर), करण संदीप चिकणे (वय २०, रा. सातववाडी, गोंधळेनगर, हडपसर), अजहर रमजान सय्यद (वय २३, रा. काशेवाडी, भवानी पेठ), सुशांत सुधाकर धोत्रे (वय १९, रा. संतोषनगर, कात्रज), आयाजन नियाज शेख (वय १९, रा. न्यू मोदीखाना, कॅम्प), रिहान रमजान सय्यद (वय २०, रा. काशेवाडी, भवानी पेठ), अरजान शाहीद शेख (वय १९, रा. न्यू नाना पेठ), फरहान सतिश येनपुरे (वय १९, रा. सारस सोसायटी, धनकवडी), दुर्गेश् हनुमंत सिद्धापुरे (वय १८, रा. फुरसुंगी, हडपसर), अंकीत राजू हकाळे (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हे सर्व एकमेकांचे मित्र आहेत. त्यांना पैशांची आवश्यकता असल्यामुळे त्या सर्वांनी मिळून रात्रीच्या वेळी कात्रज येथील महामार्गावरील पेट्रोल पंप लुटण्यासाठी ते एकत्र जमले होते. परंतु, त्याअगोदरच पोलिसांना त्यांची माहिती मिळाल्यामुळे त्यांचा डाव फसला आणि त्यांच्या हातात बेड्या पडल्या.
याबाबत पोलीस अंमलदार निलेश खैरमोडे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कदम, पोलीस अंमलदार मंगेश पवार, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ,निलेश खैरमोडे, चेतन मोरे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले हे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने १५ सप्टेबर रोजी रात्री पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना बातमी मिळाली की, शनिनगर चौकातील महादेव मंदिराचे मागील बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये काही जण हत्यारासह एकत्र जमले आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्याची खात्री केली. तेव्हा अंधारामध्ये काही जण बसलेले आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चारही बाजूने घेरुन पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. त्यांना पोलिसी हिसका दाखविल्यावर त्यांनी आम्ही सर्व एकमेकांचे मित्र असून पैशांची गरज असल्याने महामार्गावरील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत येथे एकत्र जमलो होतो, असे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील (PI Dashrath Patil) तपास करीत आहेत. (Katraj Pune Crime News)
गणपती उत्सव Video –
https://www.instagram.com/p/DAAYeqjpgss
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा