Katraj Pune Crime News | अडविल्याने दुचाकीस्वाराची वाहतूक पोलिसाला मारहाण; कात्रज बायपास चौकातील घटना
पुणे : Katraj Pune Crime News | वाहतूक नियमभंग (Traffic Rules Violation) करुन वेडीवाकडी दुचाकी चालवित असल्याने वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) त्याला अडविले. त्यातून दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करुन मारहाण केली. भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) या दुचाकीस्वाराला अटक केली आहे.
आशीष रामचंद्र चव्हाण Ashish Ramchandra Chavan (वय ३७, रा. चंद्राई हाईटस, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक सदाशिव भोईर यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना कात्रज बायपास चौकात (Katraj Bypass Chowk) शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक भोईर हे कात्रज बायपास चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी आशीष चव्हाण हा दुचाकी जोराने व वेडीवाकडी चालवत नियमभंग करुन आल्याने भोईर यांनी त्याला थांबविले. त्याच्याकडे लायसन, कागदपत्रे मागितली. तेव्हा त्याने अरेरावी व उद्धट वर्तन करत फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. फिर्यादी यांच्या डाव्या गुडघ्यावर व कंबरेवर जोरजोराने लाथा मारुन फिर्यादीचे डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत केली. फिर्यादी यांना शिवीगाळ करुन त्यांचा शासकीय गणवेशाचा खिसा फाडून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन भोईर याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन