Katraj Pune Crime News | दरोडा टाकण्यासाठी जमलेले टोळके ताब्यात ! कात्रज गावातील ज्वेलर्सवर टाकणार होते दरोडा

Arrest

पुणे : Katraj Pune Crime News | कात्रज येथील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी जमलेल्या एका टोळक्याला पोलिसांनी पकडले़ खुनाचा गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या एका अल्पवयीनासह ६ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत चेतन नारायण गोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांवर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रज गावात शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज गाव येथील गणेश मित्र मंडळाजवळ काही जण जमले असून त्यांच्याकडे कोयता, पालघन, मिरची पुड, दुचाकीसह थांबले असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने तेथे पथक पाठवून या मुलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तिघांना पकडण्यात यश आले. मात्र तिघे पळून गेले. पोलिसांनी त्यांच्याकडून कोयता, पालघन, मिरची पुड व दुचाकी जप्त केली आहे.
अधिक चौकशी केल्यावर कात्रज गावातील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी एकत्र आल्याचे सांगितले.
हे सर्व जण अल्पवयीन असून त्यांच्यातील एकाच्या नावावर यापूर्वी खुनाचा गुन्हाही दाखल आहे.
पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी (PSI Nilesh Mokashi) तपास करीत आहेत. (Katraj Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed