Katraj Pune Crime News | पुणे : ‘तू माझी झाली नाहीस तर मी तुझ्या घरातील कोणाला सोडणार नाही’ ! तडीपार गुंडाचा घरात शिरुन राडा, कात्रजमधील घटना

Molestation-Case

पुणे : Katraj Pune Crime News | खून तसेच (Murder CAse) विविध गुन्ह्यांमुळे तडीपार करण्यात आलेल्या गुंडाने तडीपारीचा (Tadipar Criminal) भंग करुन कात्रजमधील एका घरात शिरुन मुलीला धमकी दिली. ‘‘तू माझी झाली नाहीस तर मी तुझ्या घरातील कोणालाच सोडणार नाही व स्वत:चा देखी जीव देईन, ’’ अशी धमकी तो देत होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) त्याला कोयत्यासह अटक केली.

https://www.instagram.com/p/DAKvEUAijmD

दत्ता राहुल कदम Datta Rahul Kadam (वय २३, रा. अंजलीनगर, कात्रज) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार नवनाथ भोसले यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मांगडेवाडी, जाधवनगर येथील सोसायटीत घडली.

https://www.instagram.com/p/DAKsk3Kiixv

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता राहुल कदम व त्याच्या साथीदारांनी प्रकाश रेणुसे याच्यावर १३ डिसेबर २०२२ रोजी लोखंडी रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना प्रकाश रेणुसे यांचा १९ डिसेंबर रोजी मृत्यु झाला. दत्ता कदम यांच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांनी त्याला ऑगस्ट २०२३ मध्ये तडीपार केले होते.

https://www.instagram.com/p/DAKn0jni3HB

फिर्यादी व त्यांचे सहकारी विटेकर हे गुरुवारी सायंकाळी कात्रज मार्शल म्हणून पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नियंत्रण कक्षातून (Pune Police Control Room) त्यांना एका महिलेचा कॉल मिळाला. कॉल करणारी महिला घरात नसून एका मुलगा त्यांच्या घरात शिरला आहे. त्यांच्या मुलीला चाकूचा धाक दाखवत आहे. फिर्यादी हे या महिलेसह सोसायटीत पोहचले.

https://www.instagram.com/p/DAJM7t8pKwn

तेव्हा सोसायटीच्या पार्किंगमध्ये लोक जमा झाले होते. तडीपार गुंड दत्ता कदम हा हातातील कोयता हवेत फिरवून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना धमकावून शिवीगाळ करीत होता. तो ‘‘तू माझी झाली नाहीस तर मी तुझ्या घरातील कोणालाच सोडणार नाही व स्वत:चा देखील जीव देऊन ’’ अशी धमकी मोठ मोठ्याने ओरडून देत होता. स्वत:च्या हातावर कोयता मारुन घेत होता. फिर्यादी व विटेकर यांनी त्याला कोयत्यासह पकडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आले. तडीपारीचा भंग करण्याबरोबर, आर्म अ‍ॅक्टखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी (PSI Nilesh Mokashi) तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAI8Iy0irKr

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्‍या गुन्हेगाराला अटक

Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)