Katraj Pune Crime News | पुणे: कात्रज परिसरात पोलिसांनी २ लाख ४३ हजारांचा गांजा पकडला

Arrest

पुणे : Katraj Pune Crime News | गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell of Pune) कात्रज परिसरात एका तस्कराकडून २ लाख ४३ हजार रुपयांचा गांजा पकडला. देव नरेश तनेजा Dev Naresh Taneja (वय २४, रा. कात्रज) असे या तस्कराचे नाव आहे. (Pune Crime Branch)

अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार संदिप शेळके यांना बातमी मिळाली की, कात्रज येथील एकता मित्र मंडळ चौकात एक जण गांजा घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून देव तनेजा याला पकडले. त्याच्याकडून २ लाख ४३ हजार रुपयांचा गांज पकडण्यात आला असून त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक (API Nitinkumar Naik) तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar IPS),
सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma IPS), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade IPS), पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (Nikhil Pingle DCP), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (Rajendra Mulik ACP) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड (Sudarshan Gaikwad PI), सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार संदिप शेळके, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, संदिप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, साहिल शेख, अझिम शेख, आझाद पाटील, निलम पाटील यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या

Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Katraj Pune Crime News | कोर्टाने तडीपार केले असतानाही दरोड्याच्या तयारीत असलेली चुहा गँग जेरबंद ! पिस्टल, काडतुस, मॅफेड्रान, रोकड असा माल हस्तगत

You may have missed