Katraj Pune Crime News | पुणे: आमच्या आधी मटण का खाल्लं?, असा सवाल करत मित्राने फावड्याच्या दांडक्याने केली मारहाण
पुणे : Katraj Pune Crime News | नववर्षानिमित्त पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत आमच्या अगोदर मटण का खाल्ले असे म्हणून मित्रावर फावड्याच्या दांडक्याने मारहाण (Marhan) करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Attack On Youth)
याबाबत निंगेश एकनाथ म्हेत्रे (वय २३, रा. बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी धम्मपाल हणमंत सोनवणे (वय २१, रा. अंजनीनगर, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कात्रज येथील नेपाळबाबा मंदिरामागे ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही वाहनचालक आहेत. काही ड्रायव्हरांनी मिळून पार्टी आयोजित केली होती. पार्टीसाठी मटणाचा बेत आखला होता. चुलीवर मटण शिजत असतानाच निंगेश म्हेत्रे यांनी मटण खाल्ले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा धम्मपाल याने निंगेश याला शिवीगाळ करुन तेथे असलेल्या फावड्याच्या दांडक्याने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. सहायक पोलीस फौजदार आखुटे तपास करीत आहेत. (Katraj Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune PMC News | नगरसेवक नसल्याने पुणे महापालिकेचा ‘स्वैर’ कारभार !
पर्यावरण पूरक प्रकल्प राबविणार्यां मिळकत धारकांमागेच प्रशासनाचा ‘तगादा’