Khadak Police-Pune PMC | पुणे : खडक पोलिसांच्या मागणीची पालिका प्रशासनाकडून दखल, लोहियानगर मधील ‘त्या’ अतिक्रमणावर कारवाई
पुणे : Khadak Police-Pune PMC | लोहियानगर परिसरात अवैध बांधकामे (Illegal constructions in Lohianagar area) व चौका-चौकामध्ये ठेवलेले बाकडे, अतिक्रमण करुन बांधलले कट्टे व ओटे यावर पुणे महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. पालिका प्रशासनाने ही कारवाई बुधवारी दुपारी बारा ते सायंकाळी चार या दरम्यान केली. यावेळी खडक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बेकायदा करण्यात आलेल्या या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी खडक पोलिसांनी पालिका प्रशासनाकडे केली होती.
लोहियानगर व परिसरात अवैध बांधकामे व चौका-चौकात असलेले बाकडे तसेच अनधिकृत बांधलेले कट्टे, व ओटे यावर सायांकाळच्या वेळी काही समाजकंटक थांबून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व महिलांना त्रास होईल अशा पद्धतीने उभे राहत होते. तसेच या समाजकंटकांमध्ये काही जातीय किंवा धार्मिक वाद उफाळून आल्यास मोठी तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
समाजकंटकांकडून तेथे उभे राहणे व बसण्याचे ठिकाण हटवणे गरजेचे होते. त्यामुळे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे व पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमागळ यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क करुन यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार लोहीयानगर पोलीस चौकी ते लोहीयानगर कमान या दरम्यान असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत हातगाडी, काउंटर, शेड-झोपड्या, नादुरुस्त रिक्षा, काँक्रीट ओटे घण व पहारीच्या सहाय्याने तोडण्यात आले.
तर लोखंडी पत्रा शेड, स्टॉल गॅस कटरच्या सहाय्याने कापण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमाळस, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ,
वैशाली तोटेवार, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे व 15 पोलीस अंमलदार हजर होते.
तसेच महापालिकेकडून क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक गणेश तारु, राजेंद्र लोंढे,
सहायक अतिक्रमण निरीक्षक राठोड, खैरनार, 20 बिगारी सेवक, 6 महाराष्ट्र सुरक्षा फोर्स, 4 टेम्पो हजर होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड