Khadakwasla Assembly Constituency | खडकवासला मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच; भाजपच्या जागेवर अजित पवार गटाचे दबावतंत्र?
पुणे : Khadakwasla Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. मात्र काही मतदारसंघावरून महायुतीतच (Mahayuti) जागेवरून धुसफूस सुरु असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती मधील जागावाटपात अद्याप तरी कोणताही फॉर्म्युला पुढे आलेला नाही. त्यामुळे आघाडी आणि युतीतील तिन्ही पक्ष वेगवेगळ्या जागांवर दावे- प्रतिदावे करत आहेत. असाच दावा पुण्यातून भाजपाच्या आमदार असलेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला दावा सांगितला आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मागणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली तसेच आपले निवेदन दिले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांना खडकवासला मतदारसंघातून २१ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. हा मुद्दा पुढे करत ही जागा आपल्याला मिळायला हवी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना भाजप आमदार भीमराव तापकीर म्हणाले, ज्या जागेवर ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला सुटणार हे सूत्र आहे. त्यानुसार ही जागा भाजपचीच आहे. भाजपकडून मला तीनदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष पातळीवर जो निर्णय घेण्यात येईल तो निर्णय सर्वस्वी मान्य असेल.
या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम केले.
त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये देखील एकसंघपणे पुढे जाणे आवश्यक आहे. (Khadakwasla Assembly Constituency)
या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून २१ हजाराचे मताधिक्य मिळाले असले
तरी यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना तब्बल ६५ हजाराचे मताधिक्य
तर २०१४ च्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार महादेव जानकर यांना तब्बल ३५ हजार पर्यंत मताधिक्य मिळाले होते.
त्यामुळे हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ असून कोणीही दावे केले तरी हा मतदारसंघ भाजपकडेच राहील,
असा विश्वास भीमराव तापकीर यांनी व्यक्त केला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून