Khadakwasla Assembly Election 2024 | निवडणुकीच्या प्रचारार्थ महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्याकडून बालाजीनगर परिसरात गाठीभेटी घेऊन नागरिकांशी संवाद

Bhimrao Tapkir

पुणे : Khadakwasla Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा पार पडत आहेत. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. प्रचारासाठी केवळ दोन दिवस बाकी असल्याने उमेदवारांच्या पदयात्रा, रॅली, सभा, बैठका यांचा धडाका उडाला आहे.

दरम्यान खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांनी धनकवडी (Dhankawadi), बालाजीनगर (Balaji Nagar Pune) येथे निवडणुकीच्या प्रचारार्थ गाठीभेटी घेऊन नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांशी संवाद साधत असताना स्वारगेट-कात्रज मेट्रोबाबत (Swargate To Katraj Metro) माहिती देत बालाजी नगरला देखील मेट्रो स्टेशन होणार असल्याची शाश्वती तापकीर यांनी दिली.

“मतदारसंघातील विकास, नव्याने मंजूर झालेली मेट्रो, बालाजीनगर मेट्रो स्टेशन याच्या जोरावर नागरिकांनी भाजप-महायुतीलाच मतदान करावे”, असे आवाहन भीमराव तापकीर यांनी केले. यावेळी माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेविका राणी भोसले, दिगंबर डवरी, परिसरातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Khadakwasla Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : बापुसाहेब हे सामान्यांचे आधार – खासदार नीलेश लंके

You may have missed