Khadakwasla Assembly Election 2024 | खडकवासला मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा भीमराव तापकीर यांना प्रचारादरम्यान मोठा फायदा
पुणे: Khadakwasla Assembly Election 2024 | खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान मतदारसंघात तापकीर यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु आहे. याआधी केलेल्या विकासकामांचा प्रचारादरम्यान मोठा फायदा तापकीर यांना होत आहे.
वारजे माळवाडी परिसरातील सोसायटीचे वीजबिल आमदार भीमराव तापकीर यांच्यामुळे किरकोळ येऊ लागले आहे. ८ सोसायट्यांमध्ये सौर प्रकल्प योजनेद्वारे ही कमाल झाली आहे. नागरिकांच्या पैशाची मोठी बचत झाल्याचे सोसायटी धारकांनी वारजे माळवाडी परिसरातील प्रचारात नमूद केले.
तापकीर यांनी वारजे माळवाडी येथील सुयोगओरा ए, वसुधाइतिषा, अतुलनगर ए, अतुलनगर बी, ईशाननगरी, ईशानसंकुल, आणि राहुल पार्क या सोसायटीमध्ये १ कोटी १० लाख रुपये आमदार निधीतून सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. या योजनेत सोसायटीची २५ टक्के लोकवर्गणी आणि ७५ टक्के आमदारांच्या विकास निधीतून योजना राबवली.
त्यामुळे सोसायटीतील सार्वजनिक वीज वापर हा सौरऊर्जेतील विजेतून होत आहे. सुमारे २५० सदनिका असलेल्या सोसायटीचा सार्वजनिक वीजबिल ५० हजारांपेक्षा जास्त होता. सौरऊर्जा प्रकल्पानंतर आता वीज बिल दरमहा फक्त १ हजार रुपये येत आहे, असे येथील सदनिकाधारकांनी सांगितले.
“येथील आणखी ८ सोसायट्यांसाठी सुमारे ९० लाख रुपये मंजूर झाले असून, त्याचे काम सुरू आहे.
अशाप्रकारचा सौर ऊर्जेचा प्रकल्प मतदार संघातील प्रत्येक सोसायटीमध्ये सुरू करायचा आहे.
त्यामुळे नागरिकांच्या पैशाची मोठी बचत होणार आहे, तसेच सौर ऊर्जेचा वापर वाढवून वीज निर्मितीसाठी
लागणाऱ्या इंधनाची बचत होणार आहे”,असे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”