Khadakwasla Assembly Election 2024 | पुढील पाच वर्षांत सर्वाधिक आमदार निधी सहकारी गृहनिर्माण संस्था, मोठ्या सोसायट्यांमध्ये आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी वापरणार” – आमदार भिमराव तापकीर
खडकवासला (पुणे) : Khadakwasla Assembly Election 2024 | भारतीय जनता पक्ष (BJP) महायुतीचे अधिकृत उमेदवार (Mahayuti Candidate) आणि खडकवासला मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांनी आज धनकवडी भागातील प्रचार दौऱ्यात आपल्या आगामी विकास योजनांबाबत महत्वाचे विधान केले. “पुढील पाच वर्षांत खडकवासला मतदारसंघातील सहकारी गृहनिर्माण संस्था, मोठ्या सोसायट्या आणि ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आमदार निधी मोठ्या प्रमाणावर वापरणार आहे,” असे तापकीर यांनी जाहीर केले.
त्यांच्या प्रचारादरम्यान केशव कॉम्प्लेक्स, पंचरत्न, राजमुद्रा, ओंकार पार्क, राघव नगर, श्री मंगल, नर्सेस टाऊन, गणेश नगर, सह्याद्री नगर, आदर्श नगर, संभाजीनगर, वनराई कॉलनी, रामचंद्र नगर, ज्योती पार्क या भागांना भेट देऊन त्यांनी येथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि आपल्या कामगिरीचा आढावा दिला.
गेल्या पाच वर्षांत 19,031 कोटी रुपयांचे प्रकल्प खडकवासला मतदारसंघात आणण्यात यशस्वी झाल्याचा उल्लेख करताना, त्यांनी महत्त्वाचे प्रकल्प उदा. मेट्रो प्रकल्प, पश्चिम रिंग रोड, चांदणी चौक उड्डाणपूल, आणि जलसंपदा सुधारणा यांसारख्या उपक्रमांचे यशस्वी नेतृत्व कसे केले हे सांगितले.
महत्वाचे मुद्दे:
सिंहगड किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी विशेष निधी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी.
नागरी आणि ग्रामीण भागांसाठी रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा.
सोसायट्यांच्या सोलर प्रकल्पांसाठी विशेष निधी उपलब्ध.
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 32 गावांमधील मालमत्ता कराचा प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी प्रयत्न.
तापकीर यांचा पुढील दृष्टीकोन:
“खडकवासल्याचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय आहे. येत्या काळात सहकारी गृहनिर्माण संस्था, मोठ्या सोसायट्या, आणि ग्रामीण भागांसाठी पाणीपुरवठा, जलसंधारण, सौरऊर्जा, सुरक्षा व्यवस्थापन, आणि अन्य सुविधा विकसित करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार आहे. नागरिकांच्या गरजा प्राधान्याने पूर्ण करणे हेच माझे उद्दिष्ट आहे,” असे तापकीर यांनी स्पष्ट केले.
प्रचार दौऱ्यात मा.नगरसेविका वर्षाताई तापकीर, मा. नगरसेविका अश्विनीताई भागवत, मोहिनीताई देवकर, आप्पासाहेब धावणे, संतोष फरांदे, विश्वास आहेर, युवराज रेणूसे, अभिषेक तापकीर, सचिन बदक, सागर साबळे, आनंद शिंदे, दत्ता सावंत, अंकुश सोनवले, महेश भोसले, सत्यवान कामठे, सतिश घाटे, उल्हास खुटवड,दादा देवकर, पांडुरंग भोसले, अंकुश कोकाटे आणि महायुतीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
ग्रामीण भागासह नागरी क्षेत्रात विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा निर्धार व्यक्त करत,
तापकीर यांनी चौथ्या विजयासाठी जनतेचा आशीर्वाद मागितला. (Khadakwasla Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’