Khadakwasla Dam | खडकवासला धरणातून 35 हजार 574 क्यूसेसने पाणी सोडले जाणार; योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना
पुणे : Khadakwasla Dam | मागील दोन दिवसांपासून पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान खडकवासला धरणातून विसर्ग सुरु आहे. आता पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुठा नदीपात्रामध्ये सायंकाळी ४ वाजता ३५५७४ क्यूसेसने विसर्ग करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरु असलेला सायंकाळी चार ते सहा वाजता ३५५७४ क्यूसेस करण्यात येत आहे. धरणपरिसरात १०० मिमी व घाटमाथ्यावर ३०० मिमी पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.
आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो असेही त्यांनी जाहीर केलेले आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-जास्त करण्याची शक्यता आहे. पुणे महानगर प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी त्वरित घ्यावी अशी सूचना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. (Khadakwasla Dam)
या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध
-भिडे पूल
-गरवारे कॉलेज, खिलारे वस्ती परिसर
-शितळा देवी मंदिर डेक्कन
-संगम पुलासमोरील वस्ती
-महानगरपालिके जवळील पूल
-होळकर पूल परिसर
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी