Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग

rape-girl

पुणे : Khadki Pune Crime News | सोसायटीच्या गेटवर स्कुल व्हॅनची वाट पहात थांबलेल्या ९ वर्षाच्या मुलीला किचन दाखवतो, असे म्हणून खोलीत ओढून घेऊन सुरक्षा रक्षकाने तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आशिष रावत (वय ४९, रा. पड्याळवस्ती, औंध रोड, खडकी) असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याबाबत एका ४२ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजता घडली. (Khadki Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पड्याळ वस्ती येथील एका सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. फिर्यादी यांची ९ वर्षाची नात शाळेत जाण्यासाठी त्यांच्या सोसायटीच्या दारात स्कुल व्हॅनची वाट पहात थांबली होती. यावेळी आशिष रावत याने तिला जवळ बोलावून तिच्या गालाचे चुंबन घेतले. ती तेथून गेटचे बाहेर जात असताना त्याने तिला पुन्हा बोलावून चल तुला किचन दाखवितो, असे म्हणून तिला त्याचे खोलीत ओढून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन विनयभंग केला आहे. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक दिघे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Flyover | अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले – ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असे आमचे सरकार’

Hadapsar Pune News | हडपसर: बहुचर्चित भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्र्याचा हस्ते होणार उद्घाटन !

Pune ACB Trap Case | महिला सहायक सरकारी वकिल एसीबीच्या जाळ्यात; जप्त कार परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच

Sri Sri Ravi Shankar | वैचारिक अभिव्यक्ती आणि विविधता हेच भारताला भारत बनवते ! – गुरुदेव श्री श्री रविशंकर

You may have missed