Khadki Pune Crime News | चालकाला मारहाण करुन कॅब नेली पळवून ! वाटेत दोन रिक्षा, कार, पादचार्‍याला दिली धडक

Pune Crime News | Four men who met on a dating app took a young man to a secluded place and threatened to kill him

पुणे : Khadki Pune Crime News | प्रवाशांना पुणे रेल्वे स्टेशनला (Pune Railway Station) सोडण्यासाठी जाणार्‍या कॅब चालकाला अडवून त्याला चाकूचा धाक दाखवून (Robbery Case) दोघा चोरट्यांनी कॅब पळून नेली. कॅब पळवून नेताना वाटेत त्याने दोन रिक्षा, कार व पादचार्‍याला धडक देऊन ते पळून गेले. हा प्रकार अंडी उबवणी केंद्र चौक ते जंगली महाराज रोड दरम्यान रविवारी भर दुपारी साडेतीन ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडला. (Khadki Pune Crime News)

याबाबत अक्षय भाऊसाहेब काळे (वय १९, रा. कासार आंबोली, पिरंगुट) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुस्तफा शफिर कुरेशी ऊर्फ मुस्सा (वय १९, रा. महादेववाडी, खडकी) आणि सिद्धांत चव्हाण (रा. पत्रा चाळ, बोपोडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॅब कारने प्रवाशांना देहू ते पुणे रेल्वे स्टेशन असा प्रवास करत होते. अंडी उबवणी केंद्राजवळील चौकात ते आले असताना मुस्तफा कुरेशी व सिद्धांत चव्हाण यांनी त्यांची गाडी अडविली. जबरदस्तीने गाडीची चावी काढून घेतली व गाडीचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिश्यातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले.

त्यांना जबरदस्तीने गाडीत टाकले. गाडी वेगाने चालविताना त्यांनी एक पादचारी,
दोन रिक्षा व एक स्विफ्ट कारला मागून धडक दिली. जंगली महाराज रोडवर फिर्यादी
यांना खाली उतरवुन कार घेऊन ते पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ (PSI Anna Gunjal)
तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed