Khadki Pune Crime News | अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणाऱ्या आईवडिलांसह 6 जणांवर गुन्हा; मुलीने दिली तक्रार

Child Marriages

पुणे : Khadki Pune Crime News | मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही आई, वडिल, आजीने तिचा विवाह लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी येरवडा येथील १७ वर्षाच्या मुलीने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिना राजेश इरले (वय ४०), राजेश इरले (वय ४२, रा. पिंपळे गुरव), शोभा नवगिरे (वय ५५, रा. यशवंतनगर, येरवडा), संगिता रंजित गायकवाड (वय ५०, रा. बोपोडी), पती गणेश टाकळकर (वय २४, रा. वाफगाव टाकळकर वाडी, ता़ खेड), संजय टाकळकर (वय ५५, रा. वाफगाव टाकळकरवाडी, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३ मार्च ते ३० जून २०२३ दरम्यान वाफगाव टाकळकरवाडी येथे घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अल्पवयीन आहेत, हे माहिती असताना तिचे आई वडिल व इतरांनी तिला वाफगाव येथे नेले. तेथे तिचा विवाह लावून दिला. पतीने तिच्याशी जबरदस्तीने इच्छेविरुद्ध वारंवार शारिरीक संबंध ठेवले. तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत असल्याने तिने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी बालविवाह कायदा व अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक देशमाने तपास करीत आहेत. (Khadki Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून

Market Yard Pune Crime News | 15 वर्षाच्या मुलीशी शारिरीक संबंध; त्याचा व्हिडिओ काढून 20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”

Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?