Khadki Pune Crime News | पुणे : खडकी बाजार बसस्टॉपवर चौघा जणांच्या टोळक्याने भरदुपारी तरुणावर धारदार शस्त्राने गळ्यावर, पोटावर वार करुन जबरदस्तीने रोकड व मोबाईल हिसकावून नेला; तरुणावर ICU मध्ये उपचार सुरु

Marhan (1)

पुणे : Khadki Pune Crime News | कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणावर चौघा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने गळ्यावर, पोटावर, दंडावर, गुडघ्यावर वार करुन जबर जखमी केली. त्याच्याकडील रोकड व मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना खडकी बाजार बसस्टॉपजवळ शनिवारी भरदुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. (Robbery Case)

या घटनेत विशाल दीपक काळे हा तरुण जबर जखमी झाला असून त्याच्यावर वाय सी एममधील आय सी युमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत गणेश दादु पातरकर (वय १७, रा. फुलेनगर, विश्रांतवाडी) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पातरकर व विशाल काळे हे कपडे खरेदी करण्यासाठी खडकी बाजार येथे आले होते. खडकी बाजार बसस्टॉपजवळ वडापाव खाऊन ते कपडे घेण्यासाठी जात होते. त्यावेळी दोन दुचाकीवरुन चौघे जण आले़ त्यांच्यातील एकाने फिर्यादीला जवळ बोलावून तुम्ही कुठं राहता असे विचारले. त्यावर त्याने फुलेनगर, विश्रांतवाडी असे सांगितले. त्यावेळी एक जण विशाल याला तू माझ्याकडे रागाने का पाहता, असे बोलून हाताने मारहाण करुन लागला. चौघांनी दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने धारदार शस्त्र बाहेर काढल्याने ते घाबरले व दोन वेगवेगळ्या दिशेला पळाले. त्या चौघांनी विशालचा पाठलाग करुन त्याला नवीन होळकर पुलाजवळ गाठले. त्याच्याकडील दीड हजार रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. धारदार शस्त्राने विशालच्या गळ्यावर, पोटावर, पायाच्या गुडघ्यावर, दंडावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर ते चौघे पळून गेले. विशाल याला वाय सीएम हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी आय सी यु मध्ये दाखल करुन उपचार सुरु केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगार तपास करीत आहेत.

You may have missed