Khadki Pune Crime News | पुणे: ‘मी प्रॉपरचा आहे’, महिलेसोबत अश्लील कृत्य करुन पतीला मारहाण; खडकी परिसरातील घटना

Pune Crime News | Called the class home and blindfolded a minor girl and molested her on the pretext of playing food tasting game

पुणे : Khadki Pune Crime News | औषध घेण्याच्या बहाण्याने मेडिकल दुकानात येऊन महिलेसोबत अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन विनयभंग केला (Molestation Case). याबाबत महिलेच्या पतीने जाब विचारला असता ‘मी इथला प्रॉपरचा आहे, अपघात करुन मारुन टाकेन’ अशी धमकी देऊन मारहाण (Marhan) करुन जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.19) दुपारी पावणे चारच्या सुमारास खडकी बाजार (Khadki Bazar) परिसरात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. (Khadki Pune Crime News)

याबाबत 23 वर्षीय विवाहित महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार सागर सतिश हुले Sagar Satish Hule (वय-35 रा. सुरती मोहल्ला, जुना खडकी बाजार, खडकी) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 75(अ), 78, 115(2), 351(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे खडकी बाजार परिसरात मेडीकलचे दुकान आहे. तर फिर्यादी यांचा ग्राहक असून तो सतत दुकानातून औषधे घेऊन जात होता.

आरोपीने औषधे घेण्याच्या बहाण्याने दुकानात येऊन फिर्य़ादी यांच्यासोबत अश्लील कृत्य केले. तसेच अश्लील बोलू लागला. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु होता. शुक्रवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास आरोपी दुकानात आला. त्याने फिर्यादी यांच्यासोबत छेडछाड केली. त्यानंतर अश्लील बोलू लागला. महिलेने याबाबत पतीला सांगितले. पतिने आरोपीकडे याबाबत जाब विचारला असता सागर हुले याने तुम्ही येथे जगण्यासाठी आला आहे.

मी इथला प्रॉपरचा आहे. मी तुझा खडकी मधील पोरांच्या मदतीने अपघात करुन मारु टाकेन.
तु येथे मेडीकल कसे चालवतो तेच बघतो असे म्हणून फिर्य़ादी यांच्या पतीला तोंडावर व नाकावर मारहाण
करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रेणुका गालफाडे करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके
यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत

Dandekar Pool Pune Crime News | पुणे: अल्पवयीन मुलीकडे लग्नाची मागणी करुन असभ्य वर्तन, 40 वर्षीय नराधमाला अटक

You may have missed