Khadki Pune Crime News | टोळक्याने दोघा तरुणावर कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न ! खडकी बाजारमधील घटनेत टेम्पोचालक, महाविद्यालयीन विद्यार्थी गंभीर जखमी

koyta

पुणे : Khadki Pune Crime News | रस्त्याच्या कडेला असलेल्या नाष्ट्याच्या दुकानात नाष्टा करीत असलेल्या दोघा तरुणांवर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन टोळक्याने जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) करुन दहशत माजविली.

याबाबत नितेश विनोद पवार (वय २४, रा. अरुणकुमार वैद्य वसाहत, खडकी बाजार) यांनी खडकी पोलिसांकडे (Khadki Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राहुल मोहिते ऊर्फ बुरण्या, गणेश साळुंखे ऊर्फ छोट्या लोहार, नकुल गायकवाड, अंश गोपनारायण ऊर्फ जंगल्या, आदित्य वाघमारे ऊर्फ ड्रँगो, तुषार राजेंद्र डोके ऊर्फ बबलु डोके, चाँद शेख, गौरव (सर्व रा. महादेववाडी, खडकी) व इतर४ ते ५ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खडकी बाजार येथील अमृत मेडिकलसमोरील फुटपाथवर असलेल्या नाष्ट्याच्या दुकानाजवळ बुधवारी दुपारी साडेबारा वाजता घडला. या घटनेत नितेश विनोद पवार व राजु चौबे (रा. दर्गा वसाहत, खडकी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे टेम्पोचालक आहे तर, राजू चौबे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. पवार व राजू चौबे हे फुटपाथवरील दुकानात नाष्टा करीत होते. आरोपींशी त्यांचा काहीही संबंध नाही, असे असताना राहुल मोहिते व इतर जण तेथे आले. त्यांनी फिर्यादीला धर धर त्याला आज मारुनच टाकू असे म्हणून शिवीगाळ करुन नकुल गायकवाडने पवार यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला.
अंश याने फरशी फेकून मारुन जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
राजू चौबे याच्यावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी करुन दहशत माजवत निघून गेले.
पोलीस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ (PSI Anna Gunjal) तपास करीत आहेत. (Khadki Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन