Khadki Pune Crime News | मोक्क्यातून जामीनावर सुटलेल्या गुंडांची पोलिसांनी काढली परेड; पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न (Video)

Khadki Pune Crime News

पुणे : Khadki Pune Crime News | मोक्कातून जामीनावर (Bail In MCOCA Case) सुटलेल्या गुंडाने पुन्हा एकदा तरुणावर धारदार शस्त्राने वार (Stabbing Case) करुन गंभीर जखमी केले होते. खडकी पोलिसांनी (Khadki Police) या गुन्हेगारांची औंध परिसरात (Aundh Pune) परेड काढली होती.

https://www.instagram.com/reel/DEtrHQ3psUz/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

शुभम श्याम कवाळे ऊर्फ मांडा (वय २९, रा. चव्हाण वस्ती, बोपोडी), यश सचिन सोकटे, अदित्य प्रभाकर पटेकर ऊर्फ हनम्या ( रा. चव्हाण वस्ती, बोपोडी) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. शुभम कवाळे याच्यासह त्याच्या टोळीवर यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये मोक्का कारवाई करण्यात आली होती. नुकताच तो जामिनावर सुटून आला होता. जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्याने व त्याच्या साथीदारांनी यश चांदणे (वय २०, रा. पठाण चाळ, बोपोडी) याच्यार धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले होते.

खडकी पोलिसांनी या तिघांना अटक केली. त्यांच्या घरी पहाणी करण्यासाठी पोलिसांनी आंबेडकर चौक, कांबळे वस्ती, चव्हाण वस्ती या संपूर्ण परिसरात त्यांची पायी परेड काढली होती. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे (Sr PI Satish Jagdale), गुन्हे निरीक्षक गजानन चोरमले (PI Gajanan Chormale) , पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे (PSI Maloji Kamble), अण्णा गुंजाळ (PSI Anna Gunjal) उपस्थित होते. (Khadki Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed