Khalapur Crime News | दुर्दैवी ! जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या 18 वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू
अलिबाग : Khalapur Crime News | जैन साध्वी यांच्यासोबत चालत जाणाऱ्या भक्ताचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मीत विनोद जैन (वय-१८) असे अपघातात मृत्य झालेल्या भक्ताचे नाव आहे. रविवारी पहाटे खोपोली ते चौक दरम्यान ही घटना घडली. खालापूर पोलीस ठाण्यात (Khalapur Police Station) या गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जैन साध्वी सोबत चार ते पाच जणांचा समूह चालत खोपोली येथून चौकच्या दिशेने जात होता. यावेळी मागून आलेल्या भरधाव रिक्षाने मीत जैन याला जोरदार धडक दिली. यात मीत गंभीर जखमी झाला. त्याला चौक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. (Khalapur Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत