Kharadi Pune Crime News | आचारसंहितेचा भंग करुन गावठी कट्टा बाळणार्या सराईत गुन्हेगाराच्या खराडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणे : Kharadi Pune Crime News | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने रेकॉर्डवरील आरोपी चेक करत असताना गावठी कट्टा बाळणार्या सराईत गुन्हेगाराला खराडी पोलिसांनी (Kharadi Police) अटक केली आहे. (Gavthi Katta Seized)
आदित्य अतिश मोहिते Aaditya Aatish Mohite (वय २१, रा. रामवाडी, येरवडा) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे़. त्याच्याकडून गावठी कट्टा व दोन काडतुसे जप्त केली आहेत.
खराडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस हवालदार महेश नाणेकर, अमोल भिसे, पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे, अमोल जाधव, सुरज जाधव, श्रीकांत कोंद्रे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सुरज जाधव व श्रीकांत कोद्रे यांना त्यांच्या बातमीदारांकडून बातमी मिळाली की, आदित्य मोहिते हा सराईत गुन्हेगार खराडीतील ईवॉन आय टी पार्क येथे पिस्टल घेऊन येणार आहे. या बातमीची खात्री करुन पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहुल लागताच तो तेथून पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा व दोन काडतुसे मिळाली. मोहिते याने हे पिस्टल व काडतुसे कोठून व कशासाठी आणले. तो कोणाचा घातपात करणार होता का याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली तांगडे करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर,
पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, वैशाली तागडे, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, अमोल भिसे, सचिन घोलप,
प्रफुल्ल मोरे, अमोल जाधव, सचिन पाटील, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव यांनी केली आहे. (Kharadi Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’