Kharadi Shivane Road | खराडी-शिवणे रस्ता पूर्ण करण्यासाठी बापूसाहेब पठारे आग्रही; पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत विस्तृत चर्चा

Bapu Pathare

पुणे: Kharadi Shivane Road | मागील काही वर्षांत वडगावशेरी मतदारसंघात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. परिणामी, वाहनांची संख्या व वाहतूक कोंडी त्याच पटीने वाढलेली दिसते. पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी (Traffic Jam On Pune Nagar Road) हा नागरिकांपुढे निर्माण झालेला मोठा प्रश्न आहे. यावरच तोडगा काढण्यासाठी खराडी-शिवणे हा नदीपात्रातील प्रलंबित रस्ता पूर्ण करण्यासाठी नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. (Kharadi Shivane Road)

काल (ता. २७) पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale), अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. पृथ्वीराज बी. पी. (Prithviraj B P) तसेच इतर अधिकाऱ्यांची पठारे यांनी भेट घेतली. भेटीदरम्यान, खराडी-शिवणे या रस्ता प्रकल्पातील रखडलेले भुसंपादन, निधी, कामाची सद्यस्थिती यांवर विस्तृत चर्चा पार पडली. महानगरपालिका प्रशासनाकडून काही दिवसांत या प्रकल्पाची पाहणी होणार असल्याचे समजते.

“खराडी-शिवणे हा रस्ता प्राधान्याने पूर्ण करणे फार गरजेचे आहे. हा पर्यायी रस्ता वाहतूक कोंडी लक्षणीयरित्या कमी करू शकतो. पालिका प्रशासनच्या सहकार्याने हे काम लवकरात लवकर पूर्णत्वाला नेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मागील १० वर्षांत रस्त्याच्या कामाकडे झालेले दुर्लक्ष आणि चालढकलीमुळे नागरिकांना झालेला त्रास येणाऱ्या काळात कमी होईल. पालिका प्रशासनचाही या कामात मोठा हातभार लागणार असून तत्परतेने हे काम करण्यावर भर असणार आहे”, असा विश्वास यावेळी बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Who Will Next CM Of Maharashtra | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठाच चेहरा हवा?,
दिल्लीत खलबतं; शिंदेंचीच वर्णी लागणार? राजकीय हालचाली वाढल्या

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी