Khed Alandi Assembly Constituency | अजित पवारांच्या आमदाराविरोधात सर्वपक्षीय एकवटले; विधानसभेला देणार नवा पर्याय?

पुणे : Khed Alandi Assembly Constituency | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांना थांबवण्यासाठी सर्वपक्षीय विरोधक एकवटल्याचे समोर आले आहे. शुक्रवार (दि.१८) पार पडलेल्या चाकण येथील बैठकीत खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी नवा पर्याय देण्याचा निश्चय करण्यात आला.
खेड तालुक्यात शांतता प्रस्थापित व्हावी, चांगले वातावरण राहावे, तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा, भीतीचे वातावरण नष्ट व्हावे, यासाठी समाजमान्यता असलेला आणि चांगली वर्तणूक असलेला उमेदवार तालुक्याचा आमदार व्हावा, अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती आहे.
खेड, आंबेगाव आणि जुन्नरला अजित पवार गटाचे आमदार आहे. त्यामुळे शरद पवारांनी (Sharad Pawar) या मतदारसंघावर विशेष लक्ष दिले असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. खेड तालुक्यामध्ये आमदार दिलीप मोहिते-पाटील यांची अपवाद वगळता एक हाती सत्ता आहे. तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढली असून, वादविवादाचे प्रकारही वाढू लागले आहे.
या प्रकारामुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti),
महाविकास आघाडीतीलच (Mahavikas Aghadi) नाही तर अन्य पक्षातील नेतेमंडळी एकवटली आहेत.
चाकण येथे या सर्वपक्षीय नेतेमंडळींची बैठक झाली.
त्यामुळे खेड-आळंदी मतदारसंघात नवा पर्याय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Khed Alandi Assembly Constituency)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?