Khed Pune Crime News | एटीएम फोडून १५ लाख रुपये चोरले ! चोरी करताना गॅस कटरने एटीएम जळाले

ATM

पुणे : Khed Pune Crime News | | ATM च्या गाळ्याचे कुलूप गॅस कटरने तोडून आतील १५ लाख ८१ हजार रुपये चोरट्यांनी चोरुन नेले. ही चोरी करताना गॅस कटरमुळे एटीएम मशीन जळाले. ही घटना खेड तालुक्यातील सावरदरी गावातील वासुली फाटा येथे शुक्रवारी रात्री साडेआठ ते शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत प्रमोद परब (वय ३८, रा. लोहगाव) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडे (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. (Khed Pune Crime News)

खेड तालुक्यातील सावरदरी गावात वासुली फाटालगत हिताची प्रॉपर्टीडेक्स सर्व्हिसेस मार्फत एस टीएम मशीन गाळ्यामध्ये उभारण्यात आले आहे. चोरट्यांनी एटीएम गाळ्याचे कुलूप गॅस कटरने तोडले. गाळ्यातील ए टी एम मशीनचा दरवाजा गॅस कटरचे सहाय्याने कट करुन एटीएममधील १५ लाख ८१ हजार ४०० रुपये चोरुन नेले. चोरी करताना आग लागल्याने त्यात ४ लाख रुपयांचे एटीएम मशीन जळून खाक झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते (Sr PI Nitin Gitte) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

You may have missed