Khed Tehsildar Prashant Bedse Suspended | खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे निलंबन

खेड : Khed Tehsildar Prashant Bedse Suspended | खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे (Jogendra Katyare) यांच्या पाठोपाठ आता खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे निलंबन करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिक आणि वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे, कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन करणे या व अशा विविध प्रकरणी आलेल्या तक्रारीवरून राज्य शासनाकडून बेडसे यांच्यावर गुरुवारी (दि.११) कारवाई करण्यात आली.
निलंबनाबरोबरच बेडसे यांची विभागीय चौकशी सुद्धा करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत बेडसे यांचे मुख्यालय पुणे जिल्हाधिकारी कार्यालय राहणार असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व संमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये असे महसूल विभागाचे अवर सचिव संजीव राणे यांनी आदेशात म्हंटले आहे.
निलंबन कालावधीत बेडसे यांनी खासगी नोकरी करू नये , धंदा अथवा व्यापार करू नये. तसे केल्यास निर्वाह भत्ता मिळणार नसल्याचे शासनाने म्हंटले आहे.
बेडसे हे मोहोळ आणि खेड येथे कार्यरत असताना कोरोना नियमांचे उल्लंघन करणे,
सर्वसामान्य नागरिक व वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आल्या होत्या.
त्यामुळे जनमानसात शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे.
या कारणास्तव बेडसे यांचे निलंबन करण्यात येत असल्याचे शासनाने आदेशात म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड