Kidnapping-Murder Case In Pune | मॉर्निंग वॉकला गेलेल्यांचे अपहरण करुन खुन करण्याची महिन्यात दुसरी घटना
शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचेही झाले होते असेच अपहरण
पुणे : Kidnapping-Murder Case In Pune | मॉर्निंग वॉकला घरातून बाहेर पडलेल्या नागरिकांवर पाळत ठेवून वाटेतून त्यांचे अपहरण केल्यानंतर काही वेळाने त्यांचा खुन करुन मृतदेह टाकून देण्यात आल्याची एका महिन्यांच्या आत दुसरी घटना पुण्यात घडली आहे.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांचे सोमवारी सकाळी अपहरण झाले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी दिवसभरात कोणताही संपर्क केला नाही. त्यानंतर सायंकाळी यवतजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला होता. असाच प्रकार सिंहगड पायथा येथे राहणारे शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर (Vitthal Polekar Murder Case) यांच्याबाबतीतही घडला होता. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी योगेश ऊर्फ बाबु किसन भामे (रा. डोणजे, ता. हवेली) याचा अद्याप शोध लागलेला नाही. याप्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी शुभम पोपट सोनवणे (वय २४, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) आणि मिलिंद देवीदास थोरात (वय २४, रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली आहे.
विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७०, रा. पोळेकर वाडी, सिंहगड पायथा) हे १४ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. काही अंतर गेल्यावर कारमधुन योगेश भामे हा साथीदारांसह आला. विठ्ठल पोळेकर यांना दादा, तुमच्याकडे काम आहे, असे म्हणून त्यांना कारमध्ये घेतले. त्यानंतर खडकवासला बॅकवॉटरकडे नेऊन त्यांचा खुन करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते बॅकवॉटरमधील ओसाडे गावाजवळ पाण्यात टाकून दिले होते. विठ्ठल पोळेकर यांना पायगुडे वाडी ते गोळेवाडी रस्त्याचे शासकीय कामाचा ठेका मिळाला होता. त्या कामात अडथळा आणू नये, यासाठी योगेश याने २ कोटींची खंडणी मागितली होती. त्यांनी ती न दिल्याने योगेश भामे याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. ती त्याने खरी करुन दाखविली. गेल्या २० दिवसात ग्रामीण पोलिसांना योगेश भामे याचा तपास लागू शकला नाही.
सतीश वाघ हेही सोमवारी सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकला बाहेर पडले होते.
घरापासून काही अंतर गेल्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले.
अपहरण करणारे त्यांच्या ओळखीचे असल्याचे त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर दिसून येते.
पोळेकर यांच्या प्रमाणेच अपहरणकर्त्यांनी कोणताही संपर्क केला नाही.
त्यानंतर सायंकाळी यवतजवळ वाघ यांचा मृतदेह आढळून आला. दोन्ही घटनांमध्ये अनेक सारखे दुवे असल्याचे पोलिसांना आढळून आले आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत
Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन