Kishori Pednekar On Rashmi Thackeray | राज्याच्या महिला मुख्यमंत्रीपदासाठी रश्मी ठाकरे यांच्या नावाची चर्चा नको; किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य

पुणेरा आवाज – Kishori Pednekar On Rashmi Thackeray | राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजेत, मात्र, त्यात रश्मी ठाकरे यांचं नाव असता कामा नये”. असं शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महिला मुख्यमंत्री या विषयावर बोलताना म्हटलं आहे. (Lady CM Of Maharashtra)
काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी मंगळावारी प्रसारमाध्यमांसमोर म्हटलं होतं की “महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झाली तर मला आनंदच होईल. ५० टक्के आरक्षण देण्यात आपण पहिलं राज्य होतो. महिला मुख्यमंत्री झाली तर आनंद होईलच. सगळ्या पक्षांकडे चेहरे आहेतच. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळेंचा चेहरा आहे, शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे रश्मी ठाकरे आहेत. तर काँग्रेसमध्येही चेहरे आहेत. महाविकास आघाडीमधील कोणत्याही पक्षाच्या महिला नेत्याला मुख्यमंत्रिपद मिळालं तर मला आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो, अनेक अडचणी असतात. त्यावर मात करून महिला राजकारणात येतात. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींना काम करताना आम्ही पाहिलं आहे. भाजपात तर महिलांना मंत्रिपदही दिलं जात नाही, पक्षाचं अध्यक्षपद दिलं जात नाही.
गायकवाड यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या पेडणेकर
यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, “मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे.
रश्मी ठाकरे यांनी कधीही राजकारणात रस घेतला नाही. त्या नेहमी त्यांच्या पतीबरोबर असतात याचा अर्थ असा होत नाही की त्या राजकारणात सक्रीय आहेत. महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजेत. मात्र, कारण नसताना रश्मी ठाकरे यांचं नाव त्या चर्चेत असता कामा नये”.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा