Knock Knock Cafe Ravet | पिंपरी : कॅफेच्या आडून ‘भलतंच’; ‘नॉक नॉक’ कॅफेमध्ये मुला मुलींचे अश्लिल चाळे, रावेत पोलिसांची कारवाई
पिंपरी : Knock Knock Cafe Ravet | रावेत परिसरात कॉफी शॉपच्या नावाखाली भलतेच उद्योग सुरू असल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने (Pimpri Chinchwad Crime Branch) डीवाय पाटील रोडवरील (DY Patil Road Ravet) पवणी प्राईड मधील शॉप नंबर 6 मध्ये असलेल्या ‘लव बडर्स’ कॅफेवर (Love Birds Cafe) कारवाई केली होती. याठिकाणी तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे समोर आले होते. त्यानंतर रावेत पोलिसांनी (Ravet Police Station) आणखी एका कॅफेवर कारवाई केली आहे. प्रकरणी कॉफी शॉप मालकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिला पोलीस शिपाई पौर्णीमा गणेश चव्हाण (वय-30) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ‘नॉक नॉक कॅफे’चे मालक कुणाल पांडुरंग राळे Kunal Pandurang Rale (वय-21 रा. शिवगणेश नगर, धावडे वस्ती, भोसरी) याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.10) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ध्रुवसिद्धी बिल्डींग मध्ये करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ध्रवसिद्धी बिल्डींग मधील शॉप नंबर 15 येथील नॉक नॉक कॅफे मध्ये मुला-मुलींना एकांतात बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली असून त्याठीकाणी तरुण-तरुणी अश्लील चाळे करत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने नॉक नॉक कॅफेवर छापा टाकला.आरोपीने नॉक नॉक कॅफे शॉपचा कोणताही परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावला.कॅफेमध्ये खाद्यपदार्थ विक्री करण्याच्या सार्वजनिक ठिकाणी तरुण-तरुणींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.
कॉफी शॉपच्या पहिल्या मजल्यावरील रुममध्ये 3 X 3 लांबी रुंदीचे प्लायवुडचे व पाच फूट उंचीचे 7 कप्पे दिसून आले.
या कप्प्यांना बाहेरच्या बाजूने पडदे लावून आतमध्ये बसण्यासाठी सोफा ठेवले होते.
यामध्ये महाविदयालयीन मुला मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे व बेशिस्त वर्तन करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार पोलिसांनी कॅफे मालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड