Kohinoor Sapphire at Tathawade | पिंपरी : ‘कोहिनूर सफायर’च्या बांधकाम साईटवर 19 व्या मजल्यावरुन पडून अल्पवयीन मजुराचा मृत्यू

Kohinoor Sapphire-Kohinoor Group

पिंपरी : Kohinoor Sapphire at Tathawade | ‘कोहिनूर सफायर’च्या बांधकाम साईटवर 19 व्या मजल्यावरुन पडून अल्पवयीन मजुराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.4) सायंकाळी सहाच्या सुमारास निंबाळकर नगर ताथवडे येथील कोहिनूर सफायर या बांधकाम साइटवर घडली. (Kohinoor Group)

प्रशांत बालाजी जमजाळ (वय 17, रा बालाजी नगर, चाकण. मूळ रा. मुखेड, नांदेड) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मजुराचे नाव आहे. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टर रामराव उर्फ राम सुभाषराव काळे (वय-31 रा. तपोधाम कॉलनी, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) याच्यावर भारतीय न्याय संहिता (भा. न्या. सं.) कलम 106 तसेच बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम तसेच बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2000 चे कलम 75 व 79 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत प्रशांतचे वडील बालाजी जयवंत जमजाळ (वय-45) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निंबाळकर नगर ताथवडे येथे कोहिनूर सफायर या बांधकाम साईटचे काम सुरू आहे. प्रशांत हा या ठिकाणी हेल्पर म्हणून एक दिवसासाठी कामावर आला होता. काम संपवून तो इमारतीमधून खाली उतरत असताना 19 व्या मजल्यावरून तो खाली गारबेज कटआउटच्या डक्टमध्ये पडला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

आरोपीने कामाच्या ठिकाणी सुरक्षाजाळी व इतर सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत.
त्यांच्या निष्काळजीपणामुळे फिर्यादी यांचा मुलचा खाली डक्टमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला.
राम काळे याने हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करुन फिर्य़ादी यांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभुत झाला
असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का,
माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!

Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी दिघीतील व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा,
सायबर पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या (Video)