Kolhapur Crime News | महाविद्यालयीन तरुणाचा गटारीत पाय अडकून डोके आपटल्याने मृत्यू ; नातेवाईक व मित्रांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा

Kolhapur Crime

कोल्हापूर : Kolhapur Crime News | महाविद्यालयीन तरुणाचा गटारीत पाय अडकून डोके आपटल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भाग्येश कृष्णात धुमाळे (वय-१७, रा- गावभाग) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना मंगळवार (दि.१०) दुपारी १२ वाजताच्या सुमारास केईएम हॉस्पिटल समोर घडली.

दरम्यान, चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबतची वर्दी इंदिरा गांधी इस्पितळातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाग्येश हा इचलकरंजी येथील एका महाविद्यालयात १२ वी कला शाखेत शिकत होता. सकाळी नेहमीप्रमाणे तो महाविद्यालयास गेला होता. मधल्या सुट्टीत तो मित्रासोबत चहा व नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला. याचवेळी याच महाविद्यालयातील शिक्षक येत असल्याचे पाहून भाग्येश व त्याच्या मित्रांची पळापळ सुरू झाली. यावेळी पळताना भाग्येशचा पाय गटारीत अडकल्याने तो जोरात आपटला.

त्याला तातडीने खासगी रुग्णालयात तर पुढील उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले,
मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्याच्या अचानक मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला.
यावेळी नातेवाईक व मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी नातेवाईक व मित्रांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक कुरणे करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन