Kolhapur Crime News | विहिरी काठी तोंडात बोळा कोंबलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Kolhapur Crime

कोल्हापूर : Kolhapur Crime News | गडहिंग्लज येथील कचरा डेपोलगत राहणाऱ्या महिलेचा आज (रविवार) सकाळी सोलापूरे वसाहत रोडवरील विहिरी काठी तोंडात बोळा कोंबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शोभा सदाशिव धनवडे (वय-६२) असे सदर महिलेचे नाव आहे. धनवडे या काल सायंकाळी चारपासून घरातून बेपत्ता होत्या. त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोने असल्याने या प्रकरणात घातपात घडला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Woman Dead Body Found)

आज (दि.२३) सकाळी ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शोभा यांचा मृतदेह विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तो पाण्यात न पडता विहिरीच्या काठावर मध्यभागी असलेल्या झाडात अडकल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास सुरु आहे. (Kolhapur Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed