Kolhapur Crime News | मित्रांना इन्स्टाग्रामवर लाईव्ह येण्यास सांगून तरुणाची पंचगंगा नदीत उडी
कोल्हापूर : Kolhapur Crime News | मित्रांना इन्स्टाग्रामवर लाईव्ह येण्यास सांगून व्हिडीओ करीत २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने पंचगंगा नदीत उडी टाकल्याची थरारक घटना शनिवारी (दि.२१) वरणगे पाडळी (ता. करवीर) येथे दुपारी घडली. हर्षवर्धन विजय सुतार (सध्या रा. राजोपाध्येनगर) असे त्याचे नाव आहे. लक्ष्मीपुरी, करवीर पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सायंकाळपर्यंत शोध लागला नव्हता.
https://www.instagram.com/p/DD4CdyQz9-B/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन व त्याचा भाऊ कोल्हापूर येथील मामाकडे राहण्यास आहेत. हर्षवर्धन महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दुपारी त्याने पंचगंगा नदीच्या पुलावर दुचाकी लावली. इन्स्टाग्रामवर मेसेज टाकला. त्यामुळे त्याचे मित्र, भाऊ, नातेवाईक इन्स्टाग्रामवर लाईव्ह आले. मित्रांना तुम्ही आनंदी राहा, असा मेसेज देत त्याने मोबाईलसह पंचगंगा नदीत पुलावरून उडी मारली. त्याला वाचविण्यासाठी काही मुलांनीही नदीत उड्या टाकल्या. मात्र, तोपर्यंत हर्षवर्धन पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला होता.
करवीर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक बाबासाहेब सरवदे, हवालदार बाबू भिवटे, महेश नाईक,
शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भगवान गिरी,
हवालदार संजय कोळी आदी घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती. पण तरुणाचा सुगावा लागला नाही. (Kolhapur Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत