Kolhapur Crime News | दुर्दैवी ! विषबाधेमुळे दोन घटनेत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा समावेश
कोल्हापूर : Kolhapur Crime News | विषबाधेच्या दोन घटनांमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुरगूडमध्ये दोन चिमुकल्यांचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला तर करवीर तालुक्यातील मांडरे गावात दोन सख्या भावांचा अन्नातून विषबाधा मृत्यू झाला. मांडरेतील दोन भावांच्या वडिलांचाही काही दिवसांपूर्वी विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनांमुळे कोल्हापूर हादरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरगूडच्या चिमगाव येथील रणजित आंगज यांच्या नातेवाईकांनी बेकरी मधून आणलेले कप केक दोन्ही मुलांनी खाल्ले होते. यानंतर श्रीयांश (वय-४ वर्षे) आणि काव्या (वय- ७ वर्षे) या दोघांनाही त्रास होऊ लागल्यानंतर मुरगूडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
डॉक्टरांनी काव्याला रुग्णालयात दाखल करून श्रीयांश याची तब्येत चांगली असल्याने त्यास घरी सोडले होते. काव्यावर उपचार सुरू करण्यात आले. तर श्रीयांश याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला.
तर मांडरे येथे पाटील कुटुंबातील चौघांना अन्नातून विषबाधा झाली होती. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पांडुरंग विठ्ठल पाटील यांचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तर आता कृष्णा पांडुरंग पाटील व रोहित पांडुरंग पाटील या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तर पाटील यांच्या घरातील प्रदीप पाटील यांची प्रकृती देखील चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Kolhapur Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक;
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक
Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण;
फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार;
पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या