Kondhwa Pune Crime Court News | कोंढव्यात बेकायदा टेलिफोन एक्सचेंज चालविणार्याची जामिनावर मुक्तता
पुणे : Kondhwa Pune Crime Court News | कोंढव्यात बेकायदेशीरपणे टेलिफोन एक्सचेंज (Illegal Telephone Exchange In Kondhwa) चालविणार्यास दहशतवाद विरोधी पथकाने (Anti Terrorism Squad – ATS) अटक केली होती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस एच वानखेडे (Judge S H Wankhede) यांनी या आरोपीची जामीनावर मुक्तता केली आहे.
अब्दुल कासिम अब्दुल मन्नान सिद्धीकी ऊर्फ रेहान शेख (वय ३४, रा. पिराणीवाडा, शांतीनगर रोड, भिवंडी, ठाणे) असे या मुख्य आरोपीचे नाव आहे. (Kondhwa Pune Crime Court News)
कोंढवा येथील एम ए कॉम्प्लेक्स येथे भाड्याच्या खोली राहत असलेल्या अब्दुल सिद्धीकी याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मागील काही वर्षांपासून परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल त्यांच्याकडील उपकरणाद्वारे भारतातील इच्छित मोबाईल नंबरवर अनधिकृतरित्या राऊट करुन भारत सरकारची फसवणुक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात नौशाद अहमद सिद्धीकी ऊर्फ कुमार (वय ३२, रा. मिठानगर, मुळ रा. संत कबीरनगर, उत्तर प्रदेश), मोहम्मद उजैर सौकत अली अन्सारी ऊर्फ सोनु (वय २९, रा. भिवंडी, ठाणे), अब्दुल कासिम अब्दुल मन्नान सिद्धीकी ऊर्फ रेहान शेख, प्रविण गोपाळ श्रीवास्तव (वय २९, रा. साई निवास, लखनौ, उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे.
नौशाद अहमद सिद्धीकी याने काही वर्षापासून परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल त्यांच्याकडील उपकरणाद्वारे भारतातील इच्छित मोबाईलवर फिरवून भारत सरकारची फसवणूक करत होता. अब्दुल कासिम सिद्धीकी याचे इतर आरोपींबरोबर आर्थिक व्यवहार होते. ही रक्कम आरोपीस बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज तसेच सीमकार्डचे ओटीपी देण्यासाठी प्राप्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालविण्यासाठी भाड्याने फ्लॅट, सिमकार्डस, सिमबॉक्स व इतर साहित्य इंटरनेट कनेक्शन, लॅपटॉप, फोन व इतर जप्त सिम कार्ड सुरु ठेवण्याकरीता रिचार्ज पुरविले.
आरोपीने फरार आरोपी अनुराग ऊर्फ पर्ल ऊर्फ एआयओ याच्या संपर्कात राहून त्यास बनावट व्हॉटसअॅप तयार करण्याकरीता प्राप्त ओटीपी लिस्ट पियुष गजभिये याच्या सहाय्याने तयार करुन व पाठवून सिमकार्ड व हे टेलिफोन एक्सचेंज व बेसिक फोन वापरण्याची अनुमती दिल्याचे व त्या बदल्यात अनुराग याच्याकडून क्रिप्टो करन्सीचे माध्यमातून युएसडीटी करन्सी प्राप्त झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींनी बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालवून भारत सरकारचे ५६ लाख ५७ हजार २२२ रुपयांचे
नुकसान केले आहे. गुन्ह्यातील काही आरोपी अजूनही फरार आहेत.
तसेच काही आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज चालू आहेत. जर आरोपीला जामीन दिला
तर तो क्रिप्टो करन्सीच्या पुराव्यात हस्तक्षेप करु शकतो. तसेच जामीन मिळाल्यावर तो
फरार होऊ शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन देण्यात येऊ नये,
असा युक्तीवाद सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आला.
आरोपीच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे (Adv.Vijaysinh Thombare) यांनी युक्तीवाद केला.
या गुन्ह्यात आणखी काही जप्त करायचे नाही. तपास पूर्ण झाला असून
या गुन्ह्यात जास्तीतजास्त ७ वर्षाची शिक्षा होऊ शकते. यातील अन्य तीन आरोपींना
अगोदरच जामीन देण्यात आला आहे. त्यामुळे अब्दुल कासिम सिद्धीकी याला ५० हजार रुपयांच्या
जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच दर सोमवारी व शुक्रवारी
सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान तपास अधिकार्यांपुढे हजेरी देण्याच्या अटीवर
जामीन मंजूर करण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar News | सत्तास्थापनेच्या दिरंगाईवरून शरद पवारांची टीका; म्हणाले – ‘…
हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय’
PMC Property Tax | समाविष्ट गावांतील मिळकत कर थकबाकी वसुलीला स्थगिती ! मात्र,
जुन्या हद्दीतील थकबाकी वसुलीसाठी एक डिसेंबरपासून बँड पथक
Sinhagad Road Pune Crime News | पुणे: इस्टेट एजंटचा निर्घुण खुन करणाऱ्या चौघांच्या
हवेली पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Video)
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी
Rohidas Gavde-Varsha Patole | सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या सेवेत आलेल्या रोहिदास गावडे
यांचे योगदान प्रेरणादायी – उपसंचालक वर्षा पाटोळे