Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने 41 लाखांची फसवणूक

Cyber-Crime

पुणे : Kondhwa Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये भरपूर नफा मिळत (Lure Of Profit In Share Market) असल्याचे वाटल्याने अनेक जण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment In Share Market) करण्याचा इच्छुक आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांचा ग्रुप (Cyber Thieves Group) अशा इच्छुकांना मोठी आमिष दाखवून त्यांना फसवणूक (Online Cheating Fraud Case) असल्याचे आढळून येत आहे. कोंढव्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला (Software Engineer) या सायबर चोरट्यांनी शेअर तसेच बिटकॉईन खरेदी करायला लावून तब्बल ४१ लाख २१ हजार रुपयांना गंडा घातला आहे.

याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. ते फेसबुकवर शेअर ट्रेडिंगविषयी माहिती पहात असताना त्यांना एक मेसेज आला. त्यावर त्यांनी क्लिक केल्यावर मयाती गुप्ता या नावाच्या महिलेने त्यांना शेअर ट्रेडिंग विषयी माहिती सांगितली. त्यांना एका व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये जॉईन करुन घेतले. अर्जुनसिंग हे ग्रुपचे डीन होते. त्यांनी जास्त नफा देणारे शेअर्स घेण्यास सांगितले. त्यानंतर ग्रुपमधील एकाने क्रिप्टोमध्ये गुंतवणुक करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या खात्यावर फिर्यादी हे गुंतवणुकीसाठी पैसे पाठवत राहिले.

अशा प्रकारे त्यांनी एकूण ४१ लाख २१ हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी पैसे विड्रॉल करण्याची रिक्वेस्ट टाकली असता त्यांची रिक्वेस्ट कॅन्सल केली. त्यांच्यातील एक जेम्स स्मिथ याने तुमचे पैसे व्हाईट आहेत की नाही याचे व्हेरिफिकेशन करायचे आहे. त्यासाठी लागणार्‍या ब्लॅक फंड व्हेरिफिकेशन करावे लागले. त्यासाठी फिर्यादीने पैसे भरले. पैसे विड्रॉल करण्याची प्रक्रिया फास्ट करण्यासाठी आणखी पैशांची मागणी होऊ लागली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC On Unauthorized Construction | कंपाउंडींग फी आकारून अनधिकृत बांधकाम नियमान्वीत करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महापालिकेची सर्वोच्च न्यायालयात धाव

Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी

Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता

Chandrakant Patil-Pune Flood | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी

Murlidhar Mohol – Pune Flood | केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

You may have missed