Kondhwa Pune Crime News | कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की; तरुणीने महिला अंमलदाराच्या हाताला घेता चावा, पोटामध्ये मारली लाथ

पुणे : Kondhwa Pune Crime News | दोन वर्षापूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी आणलेला तरुणीने महिला पोलीस अंमलदार यांच्या हाताला चावा घेतला तर दुसर्या महिला अंमलदाराच्या पोटात लाथ मारली.
याप्रकरणी महिला अंमलदारांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे़ त्यावरुन पोलिसांनी फाल्गुनी कुमारन पिल्ले (वय १८), कुमारन जयरामन पिल्ले (वय ४८), शितल कुमारन पिल्ले (४६, सर्व रा. वानवडी बाजार) यांच्यासह एका १४ वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढवा पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील २०२३ च्या चोरीच्या गुन्ह्यात फाल्गुनी पिल्ले हिला चौकशीसाठी हजर राहण्यास कळविले होती. ती आपल्या आईवडिलांसह पोलीस ठाण्यातील तपास पथकाच्या कक्षेत आली. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्याशी मोठ्या आवाजात बोलून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी महिला अंमलदार तिला समजावून सांगत असताना तिने त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. दुसर्या महिला अंमलदार मध्ये गेल्या असता फाल्गुनी हिने त्यांच्या उजव्या हाताला चावा घेऊन हातावर नखांनी ओरखडले. तसेच शितल पिल्ले हिने या महिला अंमलदार हिच्या पोटामध्ये लाथ मारली.
तेव्हा फिर्यादी या मध्ये गेल्या असता फिल्गुनी व शितल पिल्ले यांनी नखांनी ओरखडून जखमी केले.
उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व हवालदार अमोल हिरवे हे त्यांना शांत राहण्यास सांगत असताना कुमारन व अल्पवयीन मुलाने त्यांना धक्काबुक्की केली. ढकलून देऊन ‘‘आमच्या मुलीवर खोटा गुन्हा दाखल केला आहे.
मी तुम्हाला कोटात पाहून घेतो, तुमची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करुन तुमची नोकरी घालवितो,’’ अशी धमकी दिली.
फाल्गुनी हिने तपास पथक कक्षातील प्रिंटर आपटून तोडून नुकसान केले.
सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण (API Mohasin Pathan) तपास करीत आहेत. (Kondhwa Pune Crime News)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच
ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका