Kondhwa Pune Crime News | पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला अटक; 13 गुन्हे असलेला अविनाश शिंदे जेरबंद

पुणे : Kondhwa Pune Crime News | पिसोळी येथील पेट्रोलपंपावर (Petrol Pumb Pisoli) दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या टोळीला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) अटक केली आहे.
अविनाश धनाजी शिंदे Avinash Dhanaji Shinde (वय ३२, रा. येवलेवाडी), रोहित राजु चौधरी (वय २४, रा. येवलेवाडी), आकाश किशोर चौधरी (वय २९, रा. होळकरवाडी, शेवाळवाडी), विशााल किशोर चौधरी (वय २७, रा. येवलेवाडी), अभिजित किशोर चौधरी (वय २३, रा. देवाची ऊरुळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व सराईत गुन्हेगार आहेत.
त्यांचा म्होरक्या अविनाश शिंदे याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, दरोड्याची तयारी असे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदारांवरही खूनाचा प्रयत्न, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलीस अंमलदार विशाल मेमाणे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथक गुरुवारी रात्री गस्त घालत असताना पिसोळी येथील धर्मावत पेट्रोलपंपामागे काही गुन्हेगार एकत्र जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या गुन्हेगारांना चारी बाजूने घेरुन पकडले. त्यांच्याकडून लोखंडी तलवार, मिरची पुड, दोन मोटारसायकली असा ९१ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. धर्मावत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीने जमल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले पोलीस उपनिरीक्षक डिगोळे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी