Kondhwa Pune Crime News | कोंढवा : बहिणीविषयी अश्लिल बोलल्याने 15 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात घातला दगड; तीन अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
पुणे : Kondhwa Pune Crime News | शाळेतून घरी पायी येत असताना एकाच्या बहिणीविषयी अश्लिल बोलल्याने तिघा अल्पवयीन मुलांनी १५ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याला जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)
याबाबत १५ वर्षाच्या मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील टिळेकरनगर (Tilekar Nagar Kondhwa) येथील आकृती सोसायटीजवळ बुधवारी सकाळी ८ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा शाळेतून घरी पायी चालत येत होता. आरोपी मुलांपैकी एकाच्या बहिणीविषयी अश्लिल बोलला होता. त्या कारणावरुन तिघांपैकी एकाने रस्त्यात पडलेला दगड फिर्यादीच्या १५ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात घातला. इतर दोघांनी मुलाला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करीत आहेत. (Kondhwa Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी