Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार
पुणे : Kondhwa Pune Crime News | नराधम पिताच आपल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जवळपास वर्षभर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात कोणाला काहीही सांगायचे नाही़ नाही तर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आणीन, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. (Minor Girl Rape Case)
याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ३७ वर्षाच्या वडिलांवर पोस्को अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेबर २०२३ ते २३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्या वडिलांनी फिर्यादीला हाताने मारहाण करुन बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घरात कोणालाही काहीही सांगायचे नाही, नाही तर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आणीन, अशी धमकी दिली. फिर्यादीशी वारंवार शरीरसंबंध ठेवून तिला शारीरीक व मानसिक त्रास दिला. ही बाब तिच्या आईला माहिती झाली.
त्यानंतर तिची आई जेथे घरकाम करतात, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आई मुलीला घेऊन पोलिसांकडे आली. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर (API Vikas Babar) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”,
संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट