Kondhwa Pune Crime News | अवैध बांधकाम करणार्‍या बांधकाम व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या ! बेड्या एक फ्लॅट अनेकांना विकणे, मुदतीत फ्लॅटचा ताबा न देणे अशा अनेक तक्रारी

Kondhwa-Police-Station

पुणे : Kondhwa Pune Crime News | अवैध बांधकाम करणार्‍याबरोबरच एकच फ्लॅट दोघांना विक्री करणे, मुदतीत फ्लॅटचा ताबा न देणार्‍या बांधकाम व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नवनाथ महादेव माने (Navnath Mahadev Mane) असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ माने याने मलिकनगर, साईबाबानगर, भाग्योदयनगर, मिठानगर, शिवनेरीनगर या भागात मोठ्या प्रमाणावर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अवैध बांधकामे केली आहेत. त्याच्याविरुद्ध महापालिकेने अनेक वेळा गुन्हे दाखल केले आहेत. तरीही नवनाथ महादेव माने याने परत अवैध बांधकाम चालू केल्याने पुणे महापालिकेचे अभियंता अमोल पुंडे यांनी कोढंवा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती. त्यावरुन पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला होता. आरोपी नवनाथ माने याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

नवनाथ माने याने साईबाबानगर येथील इमारत पाडताना कोणत्याही प्रकारे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षितेबाबत उपाय योजना केल्या नाहीत. तसेच कोंढवा भागात एक फ्लॅट अनेक लोकांना विक्री करणे, ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता दमदाटी करणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने होत्या़ सहायक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर अधिक तपास करीत आहेत.

You may have missed