Kondhwa Pune Crime News | कोंढवा: घरफोडीमध्ये चोरीला गेलेले दागिने पोलिसांनी केले परत

Kondhwa Police

पुणे : Kondhwa Pune Crime News | वेगवेगळ्या घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी चोरट्यांकडून दागिने जप्त केले होते. हे दागिने पोलिसांनी त्यांच्या मालकाला परत केले. न्यायालयाच्या आदेशाने एकुण २ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज फिर्यादींना कोंढवा पोलीस ठाण्याचे (Kondhwa Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर (Sr PI Vinay Patankar) यांच्या हस्ते परत करण्यात आला. (Kondhwa Pune Crime News)

हगवणेनगरमधील पदमामणी अपार्टमेंटमध्ये घरफोडी झाली होती. कोंढवा पोलिसांनी चोरट्याला पकडून त्यांच्याकडून १ लाख ४४ हजार रुपयांचे चोरलेले दागिने जप्त केले. ते फिर्यादीला परत केले.

टिळेकरनगरमध्ये घरफोडीत चोरीला गेलेली २० हजार रुपयांची सोनसाखळी तिच्या मालकाला परत करण्यात आली. कात्रज कोंढवा रोडवरील टिळेकरनगर येथे घरामध्ये घरफोडी झाली होती. घरातील ५९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. आरोपीकडून अटकेदरम्यान माल जप्त करण्यात आला होता. तो फिर्यादीला परत करण्यात आला़. शिवनेरीनगरमधील लोणकर चाळ येथे राहणार्‍या घरातून ३० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र चोरीला गेले होते. आरोपीकडून ते जप्त करुन परत करण्यात आले.

अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja),
सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे (Dhanyakumar Godse)
यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed